बेळगाव : बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या बेलकॉन या प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात संपन्न झाला.
पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्षणात बांधकाम व्यवसायाशी संबंधित 100 स्टॉल्स मांडण्यात आले असून यश कम्युनिकेशन आणि यश इव्हेंट्स यांच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे क्रेडाई या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे सहप्रयोजक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बालाजी कॉन्क्रिट्स हे आहेत.
प्रदर्शनाचे उद्घघाटन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर मनीषचंद्र, बालाजी काँक्रिट्सचे वसंतराव तासिलदार, तुषार ताशिलदार आणि सचिन सामजी हे उपस्थित होते. क्रेडाईचे अध्यक्ष पंचाक्षरी हिरेमठ, इव्हेंट चेअरमन आणि आनंद इन्फ्राबिल्डचे संचालक आनंद अकनोजी, माजी अध्यक्ष राजेंद्र मुतगेकर, राजेश हेडा, आनंद कुलकर्णी, मदन देशपांडे, दीपक गोजगेकर, युवराज हुलजी, सिद्धाप्पा पुजारी, अनंत पाटील, विजय पाटील, गोपाळराव कुकडोळकर, सचिन कळीमनी, अमर अकनोजी यांच्यासह यश इव्हेंट्सचे अजिंक्य व प्रकाश कालकुंद्रीकर, विनय कदम, सचिन सामजी, वसंतराव ताशिलदार, चैतन्य कुलकर्णी, गोपाळ कुकडोळकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta