बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे (ता. जि. बेळगाव)च्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती व कराटे स्पर्धांसाठी निवड झाली.
बेळगाव जिल्हा पातळीवरील माध्यमिक शाळामधील 45 किलो कुस्ती वजनी गटामध्ये शुभम सुनिल चौगुले याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कराटेमध्ये 53 किलो वजनी गटात वैभव परशराम कणबरकर या विद्यार्थ्यानेही प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याना शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक जे. डी. बिर्जे व टिम मॅनेजर ए. पी. नाकाडी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta