Saturday , December 13 2025
Breaking News

पंडित नेहरू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 


बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत जिल्हा क्रिडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती, गोळाफेक व ज्युडो स्पर्धेत अव्वल कामगिरी केली व आता या विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
भिमु काटे याची कुस्ती व गोळाफेक स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड, संजीव पुजारी याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड, कार्तिक पावसकर राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी, श्रावणी पाटील राज्यस्तरीय कुस्ती व ज्युडो स्पर्धेसाठी,
ऐश्वर्या गोल्यार राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेचे क्रिडा शिक्षक निरंजन कर्लेकर व विनायक कंग्राळकर, शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ व इतर शिक्षकवर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *