Thursday , March 5 2026
Breaking News

सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शालेय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2022 चे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंक लिंगराज कॉलेज कॅम्पस बेळगाव येथे 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुले आणि मुली या दोन गटात घेण्यात आली या चॅम्पियनशिपमध्ये बेळगाव जिल्हातील जवळपास 40 स्केटर्सानी सहभाग झाले होते.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
क्वाड स्केटिंग 14 वर्षाखालील मुले : कृष्णा बस्तवाडी 2 सुवर्ण, सोहम कंग्राळकर 2 रौप्य, रुत्विक दुबाशी 2 कांस्य.
14 वर्षाखालील मुली : जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, शर्वरी दड्डीकर 2 रौप्य, सई पाटील 2 कांस्य.
17 वर्षांखालील मुले : श्री रोकडे 2 सुवर्ण, साई समर्थ आजना 2 रौप्य, प्रणव चोगुले 2 कांस्य.
17 वर्षांखालील मुली : विशाखा फुलवाले 2 सुवर्ण, सानिका कंग्राळकर 2 रौप्य.
14 वर्षाखालील मुलांचे इनलाइन स्केटिंग : प्रीतम नीलाज 2 सुवर्ण, सर्वेश कुदळे 2 रौप्य, साईराज मेंडके 2 कांस्य.
14 वर्षाखालील मुली : रश्मिता अंबिगा 3 सुवर्ण.
17 वर्षांखालील मुले : देवेन बामणे 3 सुवर्ण
17 वर्षांखालील मुली : करुणा वाघेला 3 सुवर्ण, तुलसी हिंडलगेकर 3 रौप्य.
या चॅम्पियनशिप आणि निवड चाचणीचा उद्घाटन समारंभ श्री. डी. एस. डीग्रज डीपीईओ, डीडीपीआय कार्यालय बेळगाव यांच्या हस्ते झाला. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, गणेश दड्डीकर, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव उपस्थित होते. वरील चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी आयोजित करण्यासाठी या सर्वांनी खूप कष्ट घेतले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *