Thursday , March 5 2026
Breaking News

हर्षा साखर कारखान्यात इथेनॉल विभागाचे उद्घाटन, बॉयलर प्रदीपन

Spread the love

सौंदत्ती : सौंदत्ती येथील हर्षा साखर करखान्यात शुक्रवारी 100 केएल क्षमतेच्या इथेनॉल विभागाचे उद्घाटन, बॉयलर प्रदीपन व केन कॅरिअर पूजनाचा कार्यक्रम पार पडला. हुली मठाचे उमेश्वर महास्वामी संबय्यनवरमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणार्‍या 10 शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.
2021-22 यावर्षी ज्या शेतकर्‍यांनी ऊस पुरवठा केला आहे अश्या सर्व शेतकर्‍यांना प्रति टन 100 रुपये ज्यादा देण्याची घोषणा कारखान्याच्या चेअरमन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी केली. एकूण 2021-22 हंगामात ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना ऊस तोडणी आणि वाहतूक वगळून प्रतिटन 2700 रुपये दिले जातील. केंद्र सरकारने 2021-22 या वर्षासाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा (एफआरपी) अधिक 198 जादा दर दिल्याचे होईल. 2022-23 या वर्षासाठीही केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीनुसारच दर दिला जाईल असे सांगून यावर्षीही कारखान्याला दर्जेदार ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्षांनी केले.
कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, संचालक मृणाल हेब्बाळकर, वरिष्ठ अधिकारी सदाशिव थोरात, एन. एम. पाटील, यु. सी. चौकीमठ, ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *