बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये पतंग उडविण्याबाबत जनजागृतीचा उपक्रम सदाशिव नगर येथे राबविला आहे.
सध्या अनेक शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी पतंग उडविण्याचा आनंद लुटत आहेत. पण विद्युत खांबाच्या तारांवर, झाडांच्या फांद्यामध्ये पतंग अडकणे तसेच घराच्या छतावर पतंग उडवणे धोकादायक ठरू शकते. नुकतेच अशोकनगरमध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा इमारतीच्या छतावरून पतंग उडविताना खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.या पार्श्वभूमीवर प्रसाद चौगुले यांनी जनजागृती केली आहे. विद्यार्थ्यांनी खेळाच्या मैदानात किंवा मोकळ्या जागेत पतंग उडवावेत असे आवाहन त्यांनी फलक उभारून केले आहे. विद्यार्थ्यांना दसरा सणाच्या सुट्ट्या असल्याने ते पतंगबाजी करत आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta