
बेळगाव : वाल्मिकी महर्षी हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नव्हते. रामायण लिहून संपूर्ण जगाला महाकाव्याची ओळख करून देण्याचे श्रेय महर्षी वाल्मिकींना जाते, असे प्रतिपादन आमदार अनिल बेनके यांनी महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमात बोलताना केले.
कुमार गंधर्व मंदिर येथे आज रविवारी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर महामंडळ आणि जिल्हा अनुसूचित वर्ग कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीमहर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगाला रामायणासारखा महान ग्रंथ देणाऱ्या महर्षी वाल्मिकींनीही मानवजातीसाठी योगदान दिले. मानवता हाच धर्म आहे, असे प्रतिपादनही आम. बेनके यांनी केले.
सरकारने आधीच जाहीर केल्यानुसार, वाल्मिकी समाजाचे आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढे आणण्यासाठी आरक्षण वाढवण्याच्या लढ्याचा विजय झाला आहे.याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आम.अनिल बेनके यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बोलताना राज्यसभा सदस्य ईरण्णा काडाडी म्हणाले, आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या थाटात साजरी झाली नाही. पण यंदा हा विशेष उत्सव आहे. सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार कर्नाटक सरकारने आरक्षणात वाढ केल्याचे आधीच जाहीर केले आहे, त्यामुळे हा विशेष जयंती उत्सव असेल.
10वीच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. तसेच कर्नाटक महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
पोलिस आयुक्त डॉ. एम. बी बोरलिंगय्या, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच.व्ही., अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, समाज कल्याण विभागाच्या सहसंचालक उमा सालीगौडा, मागासवर्गीय कल्याण अधिकारी लक्ष्मण बाबली, वाल्मिकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तलवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हा अनुसूचित जाती कल्याण अधिकारी बसवराज कुरीहुली यांनी स्वागत केले.
प्रारंभी श्री महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची शहरातील किल्ला तलाव परिसरातून कुमार गंधर्व मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta