हुक्केरी : हुक्केरीजवळ तीन कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या आई आणि मुलाचा मृत्यू झाला. भारती अनिल पुजेरी (28) आणि वेदांत अनिल पुजेरी (6) अशी मृतांची नावे आहेत.
दुचाकी चालवणाऱ्या अनिल शंकरय्या पुजेरी (वय 35) आणि कारमधून प्रवास करणारा किरण लोकाया सालीमठ (28) हे जखमी झाले.
अनिल पुजेरी, त्यांची पत्नी भारती आणि मुलगा वेदांत हे दुचाकीवरून जात होते. यावेळी गोकाककडून हुक्केरीकडे जाणाऱ्या कारची हुक्केरीहून घटप्रभाकडे जाणाऱ्या दोन कार आणि अनिल पुजेरी यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकी आणि इंडिका कारचा पूर्ण चक्काचूर होऊन दुचाकीवर अनिल पुजेरी यांच्या पाठीमागे बसलेल्या भारती व वेदांत यांचा जागीच मृत्यू झाला.
हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.
Belgaum Varta Belgaum Varta