बेळगाव : हलगा येथील महाराष्ट्र एकीकरण महाराष्ट्र समिती व मराठी भाषिकांच्या वतीने ग्रामपंचायतला सर्व परिपत्रके, सरकारी कागदपत्रके मराठी भाषेत द्यावीत, असे निवेदन सोमवार दिनांक 10 रोजी ग्रामपंचायत सेक्रेटरी जोसेफ फर्नांडिस यांना देण्यात आले. हे निवेदन देतेवेळी मनोहर संताजी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी भाषिक 21 टक्के पेक्षा जास्त आहेत, हलगा गावांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहोत. तेव्हा भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार एखाद्या जिल्ह्यात कानडी भाषेबरोबर 15 टक्के पेक्षा इतर भाषिक असतील तर त्यांना त्यांच्या भाषेत सर्व सरकारी परिपत्रके व कागदपत्रके देणे कायद्याने बंधनकारक आहे. तेव्हा आम्हालाही सर्व सरकारी कागदपत्रके व परिपत्रके हलगा ग्रामपंचायतने मराठी भाषेत द्यावीत, अशी आमची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर ग्रामपंचायत क्षेत्रातील कोणत्याही प्रकारचा सारा आम्ही भरणार नाही असे आंदोलन करण्यात येईल. याची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी.
यावेळी मनोहर संताजी, देवेंद्र बाळेकुंद्री, फकीरा संताजी, जोतिबा मोरे, पिराजी हनमंताचे, माणिक कामांनाचे, राजू कामानाचे, कुमार जाधव, मनोज बाळेकुंद्री, दर्शन लोहार, पिराजी संताजी, मनोहर बिळगोजी, फकीरा वासोजी, संभाजी संताजी, ज्योतिबा कानोजी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta