Wednesday , March 4 2026
Breaking News

उद्धव ठाकरेंच्या “मशाल” चिन्हाचे पिरनवाडीत जोरदार स्वागत!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव सीमा लढ्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी होते तेच चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचा आनंद यावेळी व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षाच्या नवीन नावाचे आणि चिन्हाचे बेळगावात देखील जल्लोषी स्वागत झाले.

पिरनवाडी येथे तालुका प्रमुख सचिन गोरले, तालुका उपप्रमुख पिराजी शिंदे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नारायण मूचंडीकर, गणेश आपटेकर, राजू वैजनाथ मूचंडीकर, रामनाथ मूचंडीकर, गजानन काकतीकर, प्रथमेश शिंदे व कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.

पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला आणि मशालला पुष्पहार घालून शिवसेच्या जयघोषाच्या घोषणा देऊन हा जल्लोष साजरा करण्यात आला. मशाल ही संयुक्त महाराष्ट्रची निशांनी त्यामुळे हे चिन्ह मिळाल्याने समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले

बेळगाव शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले म्हणाले, शिवसेनेला पूर्वी नोंदणीकृत चिन्ह नव्हते मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र निर्मितीला मशाल प्रेरीत करून अखंड महाराष्ट्र निर्माण करण्याची दिशा दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगान उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं आणि मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी असं आहे. उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाल्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवं चिन्ह पोहोचवण्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या तक्रारीची दखल घेत बेळगाव उत्तरच्या आमदारांकडून आश्वासनपूर्ती

Spread the love  बेळगाव : उत्तर मतदारसंघातील जनतेच्या समस्यांना प्रतिसाद देत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *