बेळगाव : बेळगाव शहराच्या टिळकवाडी तिसर्या रेल्वे गेटवरील अद्यावत रेल्वे उड्डाणपुलाचे आज खा. मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
चार वर्षांपूर्वी दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी या उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ केला होता. आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी, बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील, उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके, आमदार प्रकाश हुक्केरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta