बेळगाव : बॅ. नाथ पै फौंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, मुंबई व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ यांच्या सहकार्याने अलीकडेच वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात माननीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बेळगांवचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी यांचा नाथ पैंचे बालमित्र, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे सहकारी व कायम नाथ पैंच्या सहवासात असलेली व्यक्ती म्हणून माननीय शरद पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व नाथ पैंची चांदीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विठ्ठल याळगी यांनी नाथ पैंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. या समारंभास आमदार वैभव नाईक, आमदार बाळाराम पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, व्हिक्टर डान्टस, सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षा के. मंजुलक्ष्मी, नाथ पैंचे पुतणे शैलेंद्र पै, आदिती पै व अद्वैत पै आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta