बेळगाव : जनकल्याण इमारत व इतर बांधकाम संघ हिंदवाडी यांच्यातर्फे बांधकाम कामगार कार्डधारकांना लग्नासाठी कर्नाटक गव्हर्मेंटतर्फे मिळणारे 50 हजार रुपयाचे सहाय्यधनाचे मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी बसरीकट्टी, शिंदोळी, मास्तमर्डी, आलतगा व बेळगाव येथील कामगार कार्डधारकांना याचा लाभ मिळाला आहे. संघाचे अध्यक्ष, माजी आमदार श्री. संजय पाटील यांच्या हस्ते त्यांना मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित संघाचे उपाध्यक्ष श्री. अभय अवलकी, सेक्रेटरी श्री. सागर शेरेकर, श्री. संदीप निलजकर, खजिनदार श्री. बापूसाहेब पाटील, श्री. निरंजन जाधव, श्री. तानाजी चौगुले, ग्रामपंचायत सदस्य बसरीकट्टी व संघाचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta