बेळगाव : उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुर्दशेचे फोटो सध्या समाजमाध्यमातून वायरल होत आहेत. उड्डाणपुलाच्या कामकाजाबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे. तब्बल १४ महिन्यानंतर नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला तिसऱ्या रेल्वेगेट नजीकचा उड्डाणपूल उद्घाटनच्या दुसऱ्याच दिवशी समस्यांच्या विळख्यात अडकला आहे.
अवजड वाहतूक, अपघात आणि बेळगाव शहरात वाढलेली एकंदर वाहतूक यासाठी शहरात उभारण्यात आलेले उड्डाणपूल नागरिकांच्या सोयीपेक्षा समस्यांचेच कारण बनले आहे. तिसऱ्या रेल्वे गेटनजीक उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रस्त्यावर खड्डे दिसून आल्याने या उड्डाणपुलाच्या कामकाजात गोलमाल झाला आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta