Thursday , March 5 2026
Breaking News

बिजगर्णी, बेळवट्टी, बडस आदी गावातून काळ्या दिनाबाबत जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : आज दि. 14 रोजी बिजगर्णी, बेळवट्टी, बडस येथे जावून समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले‌.

सदर जनजागृतीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी महापौर श्री. शिवाजीराव सुंठकर, सचिव एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, संतोष मंडलिक, डॉक्टर राजूकोळकर तसेच गावचे नेते, कार्यकर्ते, इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *