Tuesday , December 9 2025
Breaking News

बेळगावात मराठा इंन्फट्रीचा सतरावा युद्धोत्तर ‘सिनर्जी’ सोहळ्याला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : सिल्व्हर बँड आणि पाईप बँडने सुरेल धून आणि त्याच्या तालावर तिन्ही सैन्यदलाच्या पथकांचे शानदार, शिस्तबद्ध संचलन, रेजिमेंटच्या ध्वजाला मानवंदना देऊन युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करून बेळगावात आज मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या सतराव्या युद्धोत्तर पुनर्मिलन ‘सिनर्जी’ सोहळ्याला प्रारंभ झाला.

कॅम्प, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आज, रविवारी ‘सिनर्जी’ या सतराव्या युद्धोत्तर पुनर्मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांच्या उपस्थितीत पुनर्मिलन मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित पुनर्मिलन मेळाव्याला असंख्य आजी-माजी सैनिक उपस्थित होते. भारत सरकारचे सहसचिव मेजर जनरल के. नारायणन यांच्यासह दहा आजी माजी लेफ्टनंट जनरल आणि एकोणीस मेजर जनरल उपस्थित होते. कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. तिन्ही संरक्षण दलांचे मिलिटरी बँडच्या तालावर झालेले शानदार संचलन मेळाव्याचे आकर्षण ठरले. रेजिमेंटच्या ध्वजाला उपस्थितांनी मानवंदना दिली. युद्ध स्मारकाला उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. वीर नारी आणि वीर मातांचा मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधील सात कंपन्या, बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप, आय एन एस मुंबई नौदलाचे पथक, इंडीयन एअर फोर्सचे पथक आणि दमण येथील कोस्ट गार्डचे पथक संचलनात सहभागी झाले होते. लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. मराठा लाईट इन्फन्ट्रीचे सिल्व्हर बँड आणि पाईप बँडने सुरेल धून वाजवून उपस्थितांची मने जिंकली.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *