बेळगाव (प्रतिनिधी) : एसजीएफआय राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि 38 व्या कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत डिव्हाईन प्रोव्हिडन्स (डीपी) शाळेचे विद्यार्थी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटिंगपटूंची निवड करण्यात आली आहे.
या चॅम्पियनशिपमध्ये दुर्वा पाटील, तुलशी हिंडलगेकर, करुणा वाघेला, शर्वरी दड्डीकर, विशाखा फुलवाले या स्केटिंगपटूंची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेले हे स्केटिंगपटू स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंकवर स्केटिंगचा सराव करतात. या स्केटिंगपटूंना डीपीच्या प्राचार्य रोझम्मा जोसेफ, केजीच्या सीनियर एल्सा सबेस्टाइन, हायस्कूलच्या टीआर सिल्व्हिया डी’लिमा पीई, प्राथमिक शाळेच्या टीआर मोनिका लोबो पीई टीआर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta