
बेळगाव : लंपी स्कीन या त्वचारोगापासून आपल्या जनावरांचे विशेषतः गोमातेचे रक्षण व्हावे या सदुद्देशाने काकती येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान (ग्राम दैवत) येथे रुद्राभिषेक करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या गाई लंपीपासून सुरक्षित रहाव्यात यासाठी काकती गावच्या समस्त ग्रामस्थांच्यावतीने काल सोमवारी हा अभिषेक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. वे. शा. स. राचय्या शिवपूजीमठ व उदय हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली झालेल्या या रुद्राभिषेक विधीत देवस्थानचे पुजारी बसय्या, सिद्दय्या आणि इरय्या यांचा सहभाग घेतला. तसेच याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष सिद्दाप्पा टुमरी, उपाध्यक्ष शिवाजी नरेगवी व इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी अभिषेकानंतर गोमातची विधीवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमास शेतकरी बांधव व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta