बेळगाव : लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्या वतीने दीपावली निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांकरिता घेण्यात आल्या होत्या. यामध्ये लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, बेडूक उडी, लिंबू चमचा, पोटॅटो रस या स्पर्धा घेण्यात आल्या आणि महिलांकरिता बॉटल स्पून, गोळा फेक, पोटॅटो रेस, मेणबत्ती पेटविणे, संगीत खुर्ची या सर्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये महिलांनी खूप मोठ्या संख्येने भाग घेतला होता.
या ग्रुपमधील सर्व महिलांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन सर्व महिलांसाठी एक आदर्श निर्माण करून दाखविला की खेळण्याकरिता कोणतीही वयोमर्यादा नसते. ज्या स्त्रिया फक्त चूल आणि मूल म्हणून घरी राहत होत्या त्या सर्व महिला या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला. या स्पर्धेकरिता समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी ग्रुपमधील माधवी सुतार, राजश्री सावंत, कल्पना भांदुर्गे, लीला मुचंडी, कोमल काक्तीकर, सुजाता पाटील, पूजा मुचंडी, तेजू पाटील, उर्मिला सोनम पाटील, लता मासेकर या सर्वांनी सहकार्य करून या स्पर्धा पार पाडल्या.