Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव येथील चोरी प्रकरणी राजस्थानमधून तीन आरोपींना अटक

Spread the love

 

बेळगाव : शहरातील मार्केट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बागवान गल्ली येथील एका दुकानातील चोरीप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून तीन आरोपींना अटक केली.

13 ऑक्टोबर रोजी सदरुद्दीन चौधरी यांच्या दुकानातून 4 लाख रोख रक्कम चोरीला गेली. याप्रकरणी सदरुद्दीन यांनी मार्केट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने तिन्ही आरोपींना शोधून त्यांना अटक केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस ठाण्याचे उपविभाग एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या नेतृत्वाखाली पीआय मल्लिकार्जुन तुलसीगेरी, पीएसआय हुसेन केरुर, शशिकुमार कुरळे, सीएचसी लक्ष्मण एस. कडोलकर, सीपीसी शंकर कुगटोली आणि खादरसाब खानम्मावर या कारवाईत सहभागी होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *