
बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ते बेळगुंदी गावापर्यंत पक्क्या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर व संबंधित गावचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आज रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्यामुळे बेनकनहळी, राकसकोप्प, बेळगुंदी आदी गावांना मदत होणार आहे.
यावेळी बोलताना चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, आमदार लक्ष्मी हेब्बाळकार यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी विशेष प्राधान्य देत रस्त्यांचा दर्जा राखून नागरिकांना दीर्घकाळ कोणताही अडथळा न येता वापरता यावा, असे निर्देश संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिले.
युवक काँग्रेसच्या नेत्या मृणाल हेब्बाळकर म्हणाले की, रस्त्यांच्या कामाच्या दर्जासाठी जनतेचाही सहभाग आवश्यक आहे.
बेनकनहळी येथील गावातील ज्येष्ठ, एपीएमसी माजी अध्यक्ष युवराज कदम, महेश कोलकार, बाळू देसुरकर, कल्लाप्पा देसुरकर, मीनाक्षी पाटील, कलावती देसुरकर, शिल्पा मुंगलीकर, मल्लेश कुरंगी, ज्योतिबा देसुरकर, कल्लाप्पा पाटील, मोनाप्पा हिमाजी पाटील, बापूजी पाटील, बापूजी कोलकार, जे. राजू दनगलकर, लक्ष्मी सुतार, शंकर पाटील, नारायण मुतगेकर, सागर लाखे, सुभाष नायका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कार्यकर्ते व निकटवर्तीय उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta