बेळगाव : विधानसभेचे उपसभापती आणि सौंदत्ती मतदारसंघाचे आमदार आनंद मामनी यांच्या निधनामुळे ऐतिहासिक कित्तूर राणी चन्नम्मा उत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. कित्तूर राणी चन्नम्मा यांनी ब्रिटिशांविरुद्धच्या युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कित्तूर उत्सव 23, 24 आणि 25 ऑक्टोबर असे तीन सौंदत्ती येथे दिवस होणार होता. आज त्याचा उद्घाटन सोहळा होणार होता. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र आमदार आनंद मामनी यांचे आजारपणामुळे निधन झाल्यामुळे हा उत्सव लांबणीवर टाकण्यात आला आहे. याबाबत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आजपासून सुरु हा होणारा उत्सव पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta