बेळगाव : समाजात अनेक अवलिया भेटतात. काहीजण आपले छंद जोपासतात तर काही सामाजिक बांधिलकी जपतात. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी जपणारा एक अवलिया म्हणजे मन्नुर येथील प्रतिष्ठित व्यक्ती, महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेतृत्व, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. आर. एम. चौगुले होत.
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ग्रामीण भागातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना ते नेहमी आर्थिक मदत करत असतात. मागील वर्षी दिशा बिर्जे नामक विद्यार्थिनीची द्वितीय वर्षाची फी आर. एम. चौगुले यांनी भरली होती. यावर्षी देखील दिशा हिला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. या त्यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta