Thursday , March 5 2026
Breaking News

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते कृषी अवजारांचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : कृषी क्षेत्र बळकट झाले तरच देशाचा विकास शक्य आहे. याबाबत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते आज बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील एकूण 19 लाभार्थी शेतकऱ्यांना विविध अवजारांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन भरघोस उत्पन्न देणारी समृद्ध कृषी जमीन निर्माण करण्यात व्यग्र व्हावे, असा सल्ला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला. डी. देवराज अरसू मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने गंगाकल्याण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मोटार, पाईप, इलेक्ट्रिक बॉक्स आणि बोअरवेलशी संबंधित स्पेअर पार्ट्सचे वाटप करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *