Tuesday , December 9 2025
Breaking News

ऊस दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू

Spread the love

 

राजू पोवार : पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांना अटक

निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, पूर परिस्थिती, कोरोना आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक कारखाने सुरू झाले आहेत. यापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ऊस दराचा तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गुरुवारपर्यंत (ता.२०) तोडगा न निघाल्याने शुक्रवारपासून (ता.२१) बेळगाव येथील विधानसभेसमोर रयत संघटनेतर्फे आंदोलन छेडले मात्र पोलिसांनी हे आंदोलन उठवले. अखेर मुख्यमंत्र्यांनी कित्तूर उत्सव व इतर कार्यक्रमाला हजेरी लावली मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सोमवारी आंदोलन कर्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्यात अटक केली. त्यामुळे यापुढील काळात तालुका आणि गाव पातळीवर आंदोलन करण्याचा इशारा
चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे.
शुक्रवारी (ता.२१) सकाळी चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ते आंदोलनासाठी जात असताना संकेश्वर पोलिसांनी हतरगी टोलनाक्यावर आडवून त्यांना अटक केली. त्यामुळे भर रस्त्यावर बसूनच कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर दुपारी आंदोलकांना परत जाण्याचे आवाहन केले. पण ऊस दराबाबत तोडगा निघूपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संकेश्वर पोलीस ठाण्यातच ठिय्या मारला होता. त्यानंतर शनिवारी (ता.२२) रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.तिथेही ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
पोवार म्हणाले, अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मधील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे निपक्षपातीपणे झालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी भरपाईपासून दूरच आहेत. यावर्षीही परतीच्या पावसामुळे सोयाबीन ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. साखर मंत्र्यांच्या बैठकीत ऊसाला साखर कारखाने आणि शासनाने मिळून प्रति टन ५ हजार ५०० देण्याची मागणी संघटनेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गुरुवारपर्यंत (ता२०) सुवर्ण मध्य काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण अद्याप त्याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच गुरुवारपर्यंत (ता.२०) शासनाच्या आदेशाची वाट पाहून शुक्रवारी (ता.२१)पासून बेळगाव येथील विधानसभेसमोर धरणे आंदोलन केले.पण हातरगी पोलिसांनी अडवले. पण ऊस दराबाबत तोडगा निघेपर्यंत कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून परतले नाहीत.
जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री कित्तूर उत्सवाला असून त्यावेळी त्यांची भेट घालून देण्याची आश्वासन मिळाले होते. तरीही रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून दर जाहीर करावा. अन्यथा माध्यमाशी बोलून यंदाच्या हंगामातील दर जाहीर करण्यात हरकत नव्हती. मात्र तो दर शेतकऱ्यांना मान्य नसल्यास यापुढी काळात आंदोलन केले जाईल, असा इशाराही पोवार यांनी दिला आहे.
यावेळी शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच अनेक कार्यकर्त्यानी आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
या आंदोलनात चुन्नापा पुजारी, रमेश राघवेंद्र नाईकपाटील, बाबासो पाटील, नानासाहेब पाटील, संजय नाईक, रमेश पाटील, प्रा.हालापा ढवणे, संजय पोवार, बबन जामदार, वासू पांढरोळी, रमेश मोरे, शिवानंद मुगलीहाळ, मल्लापा अंगडी, गणेश एळगेरयांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *