बेळगाव : बिजगर्णी (ता. बेळगाव) दीपावलीच्या शुभमुहूर्तावर श्री ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटनेची बैठक ब्रम्हलिंग देवालयात खेळीमेळीत संपन्न झाली.
अध्यक्षस्थानी वसंत अष्टेकर उपस्थित होते.
संघटनेचे सचिव- वाय. पी. नाईक यांनी मागील सभांचा आढावा घेऊन उपस्थितांचे स्वागत केले.
आपल्या लालमातीत कुस्तीखेळाची मोठी परंपरा आहे. अलिकडे पुन्हा ग्रामीण भागातील तरुणपिढी विविध खेळाकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. विद्यार्थी दशेतच त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
याच अनुषंगाने बिजगर्णी गावातील तालिम सुसज्ज करून सरावासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ही कुस्तीगीर संघटना प्रयत्न करणार आहे. तालिम बरीच वर्षे वापरात नसल्याने पुन्हा योग्यप्रकारची लालमाती आणून खेळण्यायोग्य करण्याचे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले. यातून पुन्हा कुस्तीला चांगले दिवस येतील असा आशावाद निर्माण झाला आहे.
कावळेवाडी गावातील चार खेळाडू भांदुर गलीत सरावासाठी बसने ये-जा करीत आहेत. त्या कुस्तीपटूनाही ही तालिम सोईस्कर होईल. गावात शाळाच नसेलतर मुले शिक्षण कुठे घेतील, तसं तालिमच नसेलतर कुस्तीचा सराव कुठे करायचा ही समस्या ओळखून या संघटनेच्या माध्यमातून हा धाडसी निर्णय घेतला आहे. अशा या विधायक उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या बैठकीस के. आर. भाष्कळ, महादेव अष्टेकर, शिवानंद हलकरणिकर, प्रकाश भाष्कळ, लक्ष्मण मोरे, रजकांत अष्टेकर, सुरेश भाष्कळ, मोणापा य.मोरे, नारायण भाष्कळ, मारूती कडोलकर, राजाराम जो. मोरे, शिवाजी भाष्कळ आदी कार्यकर्ते कावळेवाडी, बिजगर्णीतील उपस्थित होते.
शेवटी आभार सहसचिव मनोहर प. मोरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta