
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावात नवनिर्मित श्री बसवेश्वर मंदिर व इतर मंदिरांचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले.
कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री बसवेश्वर मंदिराच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते कळसारोहण व कुंभमेळा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारंजीमठचे गुरुसिद्ध महास्वामी यांचे सानिध्य लाभले. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर जलकुंभ घेऊन त्यात भाग घेतला. विविध वाद्यसंगीत पथकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अनेक मान्यवर आणि हजारो लोकांचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta