बेळगाव : मॉडेल ग्रामपंचायती अंतर्गत दूरदृष्टी या योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत आता सक्रिय झाली आहे.
आणि त्यासाठी काल 24-10-2022 रोजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष, पीडीओ, अरूण नाईक ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी गावातील प्रत्येक वार्डमध्ये जाऊन वार्ड सभा घेतल्या. गावामध्ये एकूण 13 वार्ड आहेत. या वार्ड सभांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या वार्ड सभा दूरदृष्टी योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या, या निमित्ताने गावातील वेगवेगळ्या वार्ड मध्ये जाऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेऊन तसेच विकास कामांबाबत त्यांचे मत जाणून घेण्यात आले. या सभा गावातील दत्त मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल रखुमाई, मंदिर ब्रह्मलिंग, मंदिर परमेश्वर मंदिर आणि अवचारहट्टी येथील गणपती मंदिरामध्ये घेण्यात आल्या. या सभेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतिश बा. पाटील यांनी दूरदृष्टी योजनेविषयी माहिती सांगून ते पुढे म्हणाले की जोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तुमच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत दूरदृष्टी योजनेचा आराखडा तयार करता येत नाही. त्यामुळे यामध्ये गावातील नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. तसेच विकास कामासंदर्भात काही समस्या असतील किंवा तुमची काही मते असतील तर त्या 2 दिवसात वार्ड सदस्यांना कळवाव्या, असे आवाहन यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केले.
यावेळी पीडीओ यांनीही लोकांना मार्गदर्शन केले. तसेच एसआयआरडी अधिकारी बी. एच. बजंत्री यांनीही दुरदृष्टी योजनेची सविस्तर माहिती देताना पुढील पाच वर्षाच्या विकासकामांच्या दुष्टिकोनातून वेगवेगळया विभागांची माहिती दिली.
यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पीडीओ, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta