बेळगाव : न्यू गुड्स शेड रोड, बेळगाव येथील श्री क्रांतिवीर सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाजपा कर्नाटक राज्य युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका मेधा हळदणकर यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
याप्रसंगी किरण जाधव, रेणू किल्लेकर, मेधा हळदणकर, कुस्ती संघटनेचे अशोक हलगेकर, महादेव चौगुले यांची यावेळी समयोचित भाषणे झाले. मंडळाच्यावतीने सामाजिक हितोन्नतीच्या अनुषंगाने भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी सर्वानुमते घेतला.
याप्रसंगी अभिजीत कंग्राळकर, सदा शिन्नोळकर, अरुण काळे, अशोक जुवेकर, शिवाजी हंगिरकर, मंगेश देसाई, मोहन मन्नुरकर, भावकांन्ना बंडाचे, आदेश बर्डे, गणेश दड्डीकर यासह श्री क्रांतिवीर सेवा संघाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta