बेळगाव : बेळगाव मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण नीती (एन.ई.पी.) पाठ्यक्रमानुसार शिकणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांच्यासाठी “स्किल डेव्हलपमेंट अँड रिसर्च मेथोडोलॉजी “विषयावर एकदिवशीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून खानापूर सरकारी पदवी महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रमुख डॉ. विद्या जिर्गे या उपस्थित होत्या. तर प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर हे अध्यक्षस्थान भूषवले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाल्यानंतर डॉ. डी. एम. मुल्ला यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. नंतर प्रमुख वक्त्या या नात्याने बोलताना डॉ. विद्या जिर्गे म्हणाल्या की, आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी आणि उच्च पदावर पोहोचण्यासाठी पाठ्यपुस्तका अतिरिक्त स्वतःचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे.मनुष्य स्वतःला कमी न लेखता आपल्या कौशल्य आणि शोधात्मक बुद्धिमत्ते च्या जोरावर आपले व्यक्तित्व घडवू शकतो.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर म्हणाले की, आपले कौशल्यच माणसाला सफल आणि प्रगतीपथाकडे घेऊन जाते पण माणूस प्रगतीपथाकडे जात असताना मानविय मूल्यांचा सुद्धा विकास केला पाहिजे, ज्यामुळे एका सुंदर समाजाची निर्मिती साध्य आहे. या कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एच. जे. मोळेराखी, नँक संयोजक प्रा.आर.एम. तेली, कार्यशाळाचे संयोजक प्रा. एम. बी. पाटील, सुरेखा कामुले, राजू हट्टी, जगदीश यळ्ळुर आणि इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना भोसले यांनी केले तर प्रा.भाग्यश्री चौगुले यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta