Friday , March 6 2026
Breaking News

सैनिकांचा नेहमी आदर करा! ; आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

Spread the love

 

सुळगा (हिं.) : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते गणेशपुर येथे नव्याने सुरू झालेल्या सैनिक सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनानंतर बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, सैनिकांना फायदा व्हावा या उद्देशाने ही सोसायटी सुरू करण्यात आली आहे. पाऊस, वारा, थंडी याची परवा न करता देशसेवेत व्यस्त असलेल्या आपल्या सैनिकांची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे, त्यांच्या सेवेमुळे आपण सर्व सुरक्षित आहोत. सैनिक या देशाची संपत्ती आहे, त्यामुळे त्यांचा नेहमीच आदर केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी राजाराम कोळे, हरिश्चंद्र पाटील, युवराज कदम, उत्तम पाटील, शाहू पाटील, सुबराव बोगण, राजाराम फडके, सदानंद साळुंके, विनायक देवकर, तुकाराम कांबळे, संजीवनी पाटील, सविता जाधव, जिवबा किवढे, रावजी पाटील, रामचंद्र पाटील, अरुण कटांबळे, मारुती सनदी, सिद्धी कुलकर्णी, विलास घाडी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *