बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बसवाण गल्ली, शहापूर येथील धामणेकर कुटुंबियांनी पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधा लक्ष्मण धामणेकर यांचे दि. 30 रोजी निधन झाले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव व उपस्थित मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा समाज सुधारणा मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देऊन आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली. त्यास लागलीच धामणेकर कुटुंबियांनी मान्यता देऊन पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. धामणेकर कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta