Monday , September 21 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद; धामणेकर कुटुंबियांनी पाळला पाच दिवसाचा दुखवटा!

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बसवाण गल्ली, शहापूर येथील धामणेकर कुटुंबियांनी पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधा लक्ष्मण धामणेकर यांचे दि. 30 रोजी निधन झाले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव व उपस्थित मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा समाज सुधारणा मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देऊन आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली. त्यास लागलीच धामणेकर कुटुंबियांनी मान्यता देऊन पाच दिवसाचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला. धामणेकर कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *