बेळगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून कॅम्प परिसरात अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कॅम्प परिसरातील रहिवाशांनी आज अचानक रास्तारोको आंदोलन केले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा निषेध करत खानापूर मार्ग रोखून धरला.
गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा न झाल्याने कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांची गैरसोय होत आहे. स्मार्ट पथदिप बसून बरेच दिवस उलटले तरी अद्यापही ते सुरू नाहीत. रस्त्यांची ही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी आज गुरुवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन पाणीपुरवठ्यासह विविध समस्या सोडवण्याची मागणी केली.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कॅन्टोन्मेंट भागातील सुरळीत पाणीपुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीकडे सोपविली असून आम्ही त्यांना वारंवार सूचना करत असतो. लवकरच तुमच्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढून सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले. मात्र यावर समाधान न झालेल्या आंदोलकांनी आता या क्षणीचं आमचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करत खानापूर मार्ग रोखून धरत रास्तारोको आंदोलन केले.
Belgaum Varta Belgaum Varta