Sunday , July 26 2026
Breaking News

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून सह्याद्रीनगरसाठी पथदिपांची सोय

Spread the love

 

बेळगाव : सह्याद्रीनगर (बेळगाव) येथील जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने या भागासाठी पथदिपांची व्यवस्था केली.
सह्याद्रीनगर येथील स्थानिक नागरिकांनी बुधवारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुरेसे पथदिप नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली. यानंतर बुधवारी रात्रीचं आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतः सह्याद्रीनगर परिसराला भेट देत मनपाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले. तसेच या ठिकाणी लागणाऱ्या पथदिपांची गरज ओळखून तातडीने पथदिप बसवण्याचे निर्देश दिले. आमदारांनी निर्देश देताच तातडीने पथदिप बसविण्यात आले.
मागणीची तात्काळ दखल घेऊन पथदिपांची व्यवस्था करून दिल्याबद्दल आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *