
बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर येथील महिला मंडळाच्या वतीने कार्तिक दीपोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
मंडळाच्या सदस्या रूपा कोटरस्वामी यांच्या निवासस्थानी हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी साई मंदिर टिळकवाडी येथे देखील दीपोत्सव साजरा करून साईबाबांची सेवा व आराधना केली. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. राजश्री पाटील, रूपा कोटरस्वामी, जया पाटील, रूपा वेरणेकर, राजश्री रै, शिवलीला पटणशेट्टी यांच्यासह मंडळाच्या महिला सभासद उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta