
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगावात आज शानदार पथसंचलन पार पडले. या सवाद्य संचलनात हजारो स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्ध सहभाग घेतला. संचलनानंतर लिंगराज कॉलेज मैदानावर जाहीर कार्यक्रम घेण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बेळगावात आज शानदार पथसंचलन पार पडले. सरदार्स हायस्कूल मैदानावरून या सवाद्य संचलनाला प्रारंभ झाला. त्यात हजारो स्वयंसेवकांनी संघाच्या गणवेशात अतिशय शिस्तबद्ध सहभाग घेतला. संचलन पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्धांनी गर्दी केली होती. संचलनाच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांनी “भारत माता की जय”, आणि “वंदे मातरम”च्या घोषणा दिल्या. संचलनाच्या मधोमध खुल्या जीपमध्ये उभारलेला भगवा ध्वज डौलाने फडकत होता.
सरदार्स हायस्कूल मैदानापासून सुरु झालेले. संघाचे सवाद्य पथसंचलन कॉलेज रोड, लिंगराज चौक, सरदार हायस्कूल कॉर्नर, काकतीवेस रस्ता, शनिवार खुट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, स्वामी विवेकानंद चौक, गोंधळी गल्ली मार्गे लिंगराज कॉलेजच्या मैदानावर येऊन विसर्जित झाले. तेथे जाहीर कार्यक्रम पार पडला. संचलनाच्या मार्गावर आणि घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नागरिकांनी संचलनात सहभागी स्वयंसेवक आणि भगव्या ध्वजावर फुलांची उधळण करून संचलनाचे स्वागत केले. मार्गावर ठिकठिकाणी भगवे ध्वज फडकविण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रमुख चौकांमध्ये महापुरुषांची चित्रे लावण्यात आली होती. लहान मुले महापुरुषांच्या वेषात दिसली. शिस्तबद्ध शिपायांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर लिंगराज कॉलेज मैदानावर झालेल्या जाहीर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संगोळ्ळी रायण्णा शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. धारवाड, संघाचे ज्येष्ठ प्रचारक सु. रामण्णा, नगर संघचालक बाळण्णा कग्गनगी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta