
हुबळी : तिरुपती – हुबळी पॅसेंजर रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यात काल रात्री अज्ञात व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
तिरुपती – हुबळी रेल्वे रात्री उशिरा हुबळी येथील बहट्टी येथे आली असता, डब्यांचे निरीक्षण करताना एका व्यक्तीचा खून झाला असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून हा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta