
बेळगाव : सामाजिक कार्यात कायम अग्रस्थानी असलेल्या प्राईड सहलीच्या सदस्यांनी अभय उद्यान सराफ कॉलनी येथे भेट दिली. तेव्हा त्यांनी पाहिले खूप कचरा जमा झालेला आहे. झाडाची पाने गळून सगळीकडे पसरलेली आहेत. काही ठिकाणी झाडाची फळे पडून खराब झालेली होती. त्यांना मुंग्या लागलेल्या होत्या. या उद्यानाची नेहमीच स्वच्छता करण्यात येते. येथील नागरिक कायमच उद्यान स्वच्छ ठेवत असतात आज त्यांचे कार्य प्राईड सहलीच्या सदस्यांनी केले. त्यांनी पूर्ण उद्यानमध्ये झाडू मारून गळून पडलेली झाडाची पाने एकत्र केली. खराब झालेली फळे फेकून दिली. झाडांना पाणी घातले. कीड लागलेल्या फांद्यांना छाटून फेकून दिले.
या उद्यानात सकाळ सत्रात फ्री योगा क्लासेस चालतात. अनेक नागरिक सकाळी वॉकिंगला येतात. तेथे असलेल्या व्यायामाच्या साधनाने व्यायाम करतात. तसेच संध्याकाळी सराफ कॉलनीतील सर्व छोटी मुले खेळायला येतात. येथे येणाऱ्याला एक प्रकारची शांती मिळते. स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेमुळे तेथील कचरा पाहताच सहेलीच्या सदस्यांनी हे उद्यान स्वच्छ असे मत प्राईड सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा यांनी व्यक्त केले. या उपक्रमांमध्ये जिग्ना शहा, पवन राजपुरोहित, स्नेहल शहा, अरुणा शहा, ज्योती शहा, मधु नाईक, शितल जाधव, रश्मी पाटील, मंदालसा चौगुले, रूपा मंगावती हे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta