बेळगाव : येळ्ळूर येेथील सन्मित्र मल्टिपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. राजकुमार क. पाटील व व्हा. चेअरमन पदी श्री. सतीश बा. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सन्मित्रच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सन् 2022-23 ते 2026-27 सालाकरिता पुढील 5 वर्षासाठी हा कार्यकाळ राहील, असे ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक श्री. वाय. सी. गोरल हे होते.
नूतन संचालक म्हणून श्री. प्रदिप मेणसे, गजानन उघाडे, जोतीबा बेडरे, बबन कृ. कुगजी, प्रसाद कानशिडे, पांडुरंग निलजकर, सत्यजीत पाटील, राघवेंद्र सुतार, प्रदिप सोमन्नावर, मनीषा घाडी, स्मिता कुगजी यांची निवड करण्यात आली.
बैठकीला यशवंत जाधव, चेतन हुंदरे, प्रशांत कुगजी, रमेश घाडी, कृष्णा चिट्ठी, मकरंद बेळगावकर, प्रवीण बिजगरकर, प्रकाश गोरल, महेश पाटील, सागर कुंडेकर, संदीप कुंडेकर, दिनेश घाडी, चांगाप्पा कर्लेकर, सुधीर माणकोजी आणि सन्मित्र फौंडेशनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta