बेळगाव : गांजा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या आरोपीचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरात घडली.
गांजाच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी गावातील बसगौडा इरनगौडा पाटील (वय 45) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.
हिंडलगा कारागृहातून चौकशी करण्यात आलेल्या एका व्यक्तीला त्याने गांजा दिल्याप्रकरणी त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. त्या वेळी छातीत दुखू लागल्याने त्य तातडीने जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचाराचा फायदा न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी रवींद्र गडाडी, एसीपी नारायण भरमणी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta