
बेळगाव : दरवर्षी बालदीनानिमित्त कै. श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिला जाणारा जायंट्स सखी बालगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यावर्षी सरकारी मराठी मॉडेल स्कुल, येळ्ळूरची विद्यार्थिनी समीक्षा महादेव कुगजी, न्यू इंग्लिश प्राथमिक मराठी शाळा मुतगे ची योगिता यशवंत पाटील, ठळकवाडी हायस्कूलची किरण विकास लोहार, सरकारी मराठी शाळा नं २ ची सन्मती बाहुबली शिरोटे यांची निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक वाटचालीमध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी जायंट्स सखीच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
ग्रामीण आणि शहरी भागातील वेगवेगळ्या शाळांची निवड करून त्या शाळांमधील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींची निवड करण्यात येते.
या पुरस्काराचे स्वरूप रोख एक हजार, स्मृतिचिन्ह आणि शालेय वस्तू असे असून हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी संध्याकाळी ठीक चार वाजता सुवर्णलक्ष्मी सोसायटी, गणपत गल्ली येथे संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. रेणू सुहास किल्लेकर या उपस्थित राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta