बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या वादग्रस्त विधानावरून बेळगावसह राज्यभरात राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी जारकीहोळीना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर जारकीहोळी यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.
सतीश जारकीहोळी समर्थकांनी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनाविरोधात आंदोलन छेडून शक्तिप्रदर्शन केले आहे. आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधात घोषणा बाजी करत मोठ्या संख्येने निषेध मोर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला.
मोर्चात सहभागी असलेल्या जारकीहोळी समर्थकांनी भगवे, निळे वस्त्र परिधान करून राणी कित्तुर चन्नमा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करत शक्तिप्रदर्शन करत भाजप व हिंदुत्ववादी संघटनाना इशारा दिला आहे.
यावेळी माजी आमदार संजय पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला संताप व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta