Thursday , March 5 2026
Breaking News

एंजल फौंडेशनतर्फे बालदिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून एंजल फौंडेशनतर्फे सरकारी कन्नड शाळा क्रमांक 7 फुलबाग गल्ली तसेच अंगणवाडीत विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटप करण्यात आले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
एंजल फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मीना बेनके यांनी शाळा क्रमांक 7 च्या विद्यार्थ्यांसमावेत बालदिन साजरा केला.
यावेळी बोलताना मीना बेनके म्हणाल्या की, आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करतो. लहान मुले ही देशाचे भविष्य आहेत. बालमनावर चांगले संस्कार करणे व योग्य मार्गदर्शन करणे ही पालकांची व शिक्षकांची जबाबदारी आहे. आज सरकारी शाळांकडे पालकांनी पाठ फिरवली आहे. सरकारी शाळा जगल्या पाहिजेत यासाठी एंजल फौंडेशनच्या माध्यमातून शक्य ती मदत करेन अशी ग्वाही दिली व मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी एंजल फौंडेशनच्या अलिष्का अनिल बेनके, ख्रिस्तीना पवार, मिलन पवार, शशिकला जोशी, शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए. डी. सागर, सहशिक्षक देशनूर, नदाफ, एलिगार, मल्लनावर व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *