बेळगाव : बेळगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सकल मराठा समाज वैद्यकीय विभाग यांच्या संकल्पनेतून मराठा ब्लड बँकची स्थापना करण्याचे योजले आहे.
या योजनेअंतर्गत चर्चा करण्यात आली की, बेळगावमध्ये ब्लड बँकची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने मराठा ब्लड बँक निर्माण करण्याचे ठरविले गेले आहे व पुढील उपाययोजनेबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वेगवेगळ्या भागातील नामांकित डॉक्टरचा सल्ला घेण्यात आला. यावेळी कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव, सकल मराठा समाजाचे नेते व विमल फौंडेशनचे चेअरमन श्री. किरण जाधव यांच्यासह प्रसिद्ध डॉ. समीर कुट्रे, डॉ. मिलिंद हलगेकर, डॉ. रायकर, डॉ. अनिल पोटे यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta