Sunday , July 26 2026
Breaking News

हिंडलगा येथे दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रा उत्सव संघाच्या वतीने कनकदास जयंतीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शंभर वर्षानंतर भरविण्यात आलेल्या यात्रेनिमित्त यावर्षीचा दुसरा दीपोत्सव दि. 11 रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात्रा
कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पावशे व मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते. दीपोत्सव उद्घाटक गायत्री ज्युलर्सचे मालक सुभाष रेवणकर, गायत्री रेवणकर उपस्थित होते.

प्रथम संघाचे सचिव प्रकाश बेळगुंदकर यांनी प्रास्ताविक मनोगत केले. खजिनदार उदय नाईक यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत केले. संघाचे पदाधिकारी राजू कुपेकर, श्रीकांत जाधव, तुकाराम फडके, महादेव बेळगुंदकर यांच्या हस्ते इतर
मान्यवरांचे स्वागत केले. संत कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन कृष्णा पावशे तर साधना वि. पाटील यांनी उत्कृष्ट अशी श्रीलक्ष्मी देवीची रांगोळी काढली होती, या रांगोळीचे उद्घाटन गायत्री रेवणकर यांच्या फीत सोडून करण्यात आले. रांगोळी
काढण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या चेतना अगसगेकर यांची प्रेरणा मिळाली. शिवकन्या ग्रुपच्या बालकांनी ईशगीत व स्वागतगीत सुमधूर आवाजात सादर केले.
याप्रसंगी साधना पाटील, निकिता पाटील (आंबेवाडी), संचिता ह. कोकितकर, वेदांत लाड व मकरंद लाड यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. दीपोत्सवचा शुभारंभ अरविंद गिरमजी व मीरा गिरमजी (बेंगलोर) यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील महिलावर्ग व युवतीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी शिवकन्या ग्रुपच्या बालिकानी शुभंम हे गीत
सादर केले. सुभाष रेवणकर यांनी मनोगत व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *