येळ्ळूर : श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या गेल्या 50 वर्षातील माजी विद्यार्थ्यांकडून जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक श्री. बी. एस. पाटील सर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयात सेवा केलेल्या सर्व दिवंगत गुरूजनांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यापैकी स्व. श्री. वाय. बी. चौगुले, श्री. वाय. डी. सायनेकर, श्री. आर. ए. धामणेकर आणि श्री. डी. वाय. तुबाकी या दिवंगत गुरूजनांच्या कुटुंबीयांचा देखील सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे संस्थापक गुरूवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते तर अतिथी म्हणून श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. एम. बी. बाचीकर हे होते. तसेच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. श्री. एम. एन. तमुचे यांनी सत्कारमूर्तींची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान सरांनी आपले अंतरंग उलगडले, आपल्या गोड-कठू आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या काव्यरचना सादर करून उपस्थितांची मने उल्हासीत केली. या कार्यक्रमात गावातीलच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना सत्कारमूर्तींच्या हस्ते मानधन देऊन गौरविण्यात आले. 1971 पासूनच्या सर्वच बॅचच्या विद्यार्थ्यांनी, विविध संघसंस्थांनी आणि समाजसेवी संघटनांनी सरांचा सत्कार केला.
सी. एल. कंग्राळकर, श्रीकांत घाडी, बी. बी. पाटील आदींनी कृतज्ञता व्यक्त केली. नारायण गोरे, शशिकांत देसाई, अरूण सुळगेकर या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. श्री. के. एस. कंग्राळकर यांनी प्रास्ताविक केले. जोतिबा काळसेकर यांनी स्वागत केले. वाय. बी. कंग्राळकर, आनंद तुळजाई, गणपती तारिहाळकर, राज उघाडे, एम. वाय. घाडी, प्रशांत सुतार, प्रशांत कुगजी, प्रकाश बाबलीचे, सुनील देसूरकर, मनोहर नायकोजी आदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.
डॉ. संतोष पाटील सुळगा यांनी उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. मारूती तमुचे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर येळ्ळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. पाटील यांनी आभार मानले.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …