मान्यवरांची उपस्थिती : सहा संघांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : रामपूर येथे रामपूर प्रिमियर लीग 2 चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सुमारे महिनाभर चालणार्या या स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. विजेत्यांना अनुक्रमे 7000, 5000, 3000 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ज्येष्ठ नागरिक वल्लभ देशपांडे यांच्याहस्ते यष्टीपूजन करण्यात आले. यश उपाध्ये यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन केले. पहिला सामना दत्त सॉ मिल संघ आणि साई बिल्डर यांच्यात खेळविण्यात आला. पंच म्हणून महांतेश मुगळे आणि अनिल मगदूम यांनी काम पाहिले.
यावेळी ध्रुव कम्युनिकेशनकडून सर्व व्यवस्था करण्यात आली होती. खेळाडूंना टोप्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी सचिन पोवार, प्रमोद जाधव, शशि नेसरे, सचिन चौगुले, धीरज सावंत, सूरज कुंभार, विश्वजीत पाटील, सचिन मदने, किरण गुरव, विनायक पाटील, अमित तांदळे, नितीन पोतदार, अभिषेक तांदळे, शशिकांत मदने, अक्षय पाचुंडे, संतोष घोडगेरी, अविनाश नवलगी, अक्षय दवणे, सुजित पोवार, सुनील घोडगेरी, महावीर कट्टे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta