Thursday , March 5 2026
Breaking News

दड्डी येथील बंधाऱ्याची दुरावस्था

Spread the love

 

बेळगाव : दड्डी येथील बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. बंधारा पूर्णपणे खचला असून प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यमकनमर्डी मतदारसंघातील दड्डी येथील नदीवर 2005 साली बंधारा बांधण्यात आला होता. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सदर बंधारा अल्पावधीतच मोडकळीस आला आहे. या बांधऱ्यावरून हेमरस साखर कारखान्याला ऊसाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्याचप्रमाणे चंदगड किंवा बेळगावला येणारी वाहतूक देखील याच मार्गावरून होत असते. जीर्ण झालेल्या बंधाऱ्यावरून अवजड वाहनांची ये -जा होत असताना एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी व संबंधित खात्याने वेळीच लक्ष घालून या बंधाऱ्यांची डागडुजी करावी, अशी मागणी दड्डी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *