बेळगाव (प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक हितचिंतक अभियानाचा शुभारंभ ओबीसी समाज प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय संयुक्त महामंत्री स्थानू मलाई यांच्या नेतृत्वाखाली एसपीएम रोड, बेळगाव येथील विश्वकर्मा मंदिराच्या सभागृहात अभियानाला चालना देण्यात आली.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक कोषाध्यक्ष कृष्णा भट्ट, विजय जाधव, भावकांन्ना पाटील, अच्युत कुलकर्णी, भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव तसेच विश्वकर्मा समाजाचे भरत शिरोळकर, प्रभाकर सुतार, सोमनाथ काळे, कृष्णा कणबरकर, विजय सुतार, रंजना मोदगेकर, वैष्णवी मुचंडीकर, प्रीती लोहार, रेखा आंबेवाडीकर यासह 18 समाजातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta